Wednesday, 20 June 2012

आरोग्यमंत्र्यांनी आमिर खानची मदत मागणे हास्यास्पदच आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी आमिर खानची मदत मागावी हे हास्यास्पद वाटले. दुसऱ्या बाईसाठी आपल्या बायकोचा त्याग करणाऱ्यांनी या विषयाबद्दल न बोललेलंच बरं. एका घटस्फोटित मुलीचा बाप या नात्याने मला अनेकदा प्रश्न पडतो की ज्या मुलींना आपण एवढे लाडात वाढवतो त्यांचं भविष्य मात्र अधांतरीच असतं. कुणी आमिर खानसारखा भेटला की झाले वाटोळे.आमीर खानसारख्या लोकांमुळेच कदाचित स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण वाढले असावे. आरोग्यमंत्र्यांनी स्वत:चे पद, आमीरच्या पहिल्या पत्नीच्या भावना व आमिरची योग्यता या गोष्टींचा विचार करायला हवा होता.


No comments:

Post a Comment